सावधान ! तुमच्या व्हाट्सअँप ग्रुपची लिंक गुगलवर, कोणीही होऊ शकतं ऍड ?

Spread the love

मुंबई, 22 फेब्रुवारी : व्हाट्सअँप कडून सुरक्षिततेचा दावा जरी केला जात असला तरी डेटावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सध्या व्हाट्सअँपचं ग्रुप चॅटिंग धोक्यात आहे. कारण तुमच्या व्हाट्सअँप ग्रुपची लिंक गुगलवर सर्च केल्यानंतर सापडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तुमचा प्रायव्हेट असलेला ग्रुप कोणीही जॉईन करू शकतो.

मदरबोर्डने दिलेल्या बातमीनुसार गुगल सर्चमध्ये प्रायव्हेट व्हाट्सअँप ग्रुपची इनव्हाइट लिंक मिळत आहे. या बातमीनंतर गुगलने यावर कारवाई करत इनवाइट लिंकची माहिती दाखवणं बंद केलं आहे. पण समोर आलेली त्रुटी खूप धक्कादायक होती.

व्हाट्सअँप च्या या त्रुटीचा फायदा उठवून कोणीही तुमच्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये ऍड होऊ शकलं असतं. मदरबोर्डच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला की, गुगलवर मिळणाऱ्या लिंकच्या मदतीने एक ग्रुप जॉइन केला आणि ग्रुपच्या सर्व मेंबरचा नंबर त्यांना घेता आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *