सोन्याने गाठला नवा उच्चांक, आता प्रतितोळा द्यावी लागेल इतकी किंमत

Spread the love

महाराष्ट्र २४ :पुणे – .सध्या लगीनसराईचा मोसम आहे. त्यामुळे दागदागिन्यांच्या खरेदीला उधाण आलं आहे. पण, सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मात्र बातमी फारशी उत्साहवर्धक नाही. कारण गेल्या आठवड्याभरात सोन्याचा भाव प्रतितोळा 1800 रुपयांनी वधारला आहे.

यंदा जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याच्या किमती 7 टक्क्यांनी वाढल्या आहेत. चीनमध्ये सध्या घोंघावत असलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जागतिक विकासावर परिणाम होण्याची भीती गुंतवणूकदाराच्या मनात आहे. अशा आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेच्या काळात सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित समजली जात आहे. त्यामुळे सोने खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे.

या वाढीव किमतीमुळे हिंदुस्थानात सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठल्याचं चित्र आहे. या आठवड्यात वाढलेल्या भावामुळे सोनं प्रति तोळा (10 ग्रॅम) तब्बल 42 हजार 790 रुपये इतका झाला आहे. तर चांदी प्रति किलो 48 हजार 376 रुपये इतकी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *