Sovereign Gold Bond scheme : स्वस्त सोने खरेदी करण्याची आज शेवटची तारीख

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ सप्टेंबर । सॉवरेन गोल्ड बाँड योजना (Sovereign Gold Bond scheme ) 2021-22 ची सीरिज 6 आज म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी बंद होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शासकीय सुवर्ण बाँडच्या या हप्त्याची किंमत 4,732 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केलीय. हा बाँड 30 ऑगस्टपासून अर्जासाठी खुलाय आणि आज गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख आहे. सॉवरेन गोल्ड बाँडशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या.

रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून सरकार ‘ऑनलाईन’ अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पैसे देणाऱ्या गुंतवणूकदारांना सूटही देत ​​आहे. जर तुम्ही डिजिटल पद्धतीने पैसे दिले तर तुम्हाला 50 रुपयांची सूट मिळेल. अशा प्रकारे गुंतवणूकदारांसाठी गोल्ड बॉण्डची इश्यू किंमत 4,682 रुपये प्रति ग्रॅम असेल. सामान्य गुंतवणूकदार 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतच्या संख्यांसह गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करू शकतात.

बँका (छोट्या फायनान्स बँका आणि पेमेंट बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि BSE द्वारे विकले जातात. भारतातील रहिवासी, हिंदू अविभक्त कुटुंब, ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था असलेली कोणतीही व्यक्ती सॉवरेन गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक करू शकते. बाँडचा कार्यकाळ 8 वर्षांचा आहे आणि 5 व्या वर्षांनंतर आपण त्यातून बाहेर पडू शकता. सॉवरेन गोल्ड बाँड योजना अशा गुंतवणूकदारांसाठी चांगली आहे, ज्यांना फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक करायची नाही.

भारत सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे बॉण्ड जारी केले जातात. बाँडची हमी सरकारकडून दिली जाते. सरकारने 2015 मध्ये सॉवरेन गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सांगितले होते की, या योजनेतून 31,290 कोटी रुपये जमा झालेत. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेच्या गुंतवणूकदारांना दरवर्षी 2.5 टक्के दराने व्याज मिळेल. हे व्याज सहामाही आधारावर उपलब्ध होईल. करदात्यांच्या इतर स्त्रोतांकडून उत्पन्न म्हणून ते जोडले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *