15 टक्के फी कपातीचा निर्णय यंदाच्या वर्षीपुरताच, मागील वर्षी वाढविलेल्या फीचे काय?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ सप्टेंबर । शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेला 15 टक्के फी कपातीचा निर्णय यंदाच्या वर्षीपुरताच असून गेल्या वर्षी शाळांनी वाढविलेल्या फीचे काय, असा सवाल पालक संघटनांच्या प्रतिनिधींनी केला आहे. शिक्षण विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या वर्षीच्या फी कपातीबाबत स्वतंत्र शासन निर्णय जाहीर करावा, अशी मागणीही पालक प्रतिनिधींनी केली आहे.

शिक्षण विभागाने केवळ यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठी 15 टक्के फी कपातीचा निर्णय काढला आहे. या निर्णयाला न्यायालयात आव्हान मिळण्याची शक्यता असून गेल्या वर्षीच्या फी कपातीबाबत स्वतंत्र शासन निर्णय काढण्याच्या मागणीसाठी पालक प्रतिनिधींनी नुकतीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली.

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी सर्वोच्च न्यायायलाने मागील शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक फीमध्ये 15 टक्के सवलत देण्याचे निर्देश दिले होते. यंदाच्या शैक्षणिक फीचा त्यात कुठेही उल्लेख नाही. यामुळे शिक्षण विभागाने काढलेला यासाठीच्या शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान मिळण्याची शक्यता आहे. यासाठी पालक संघटनेच्या प्रतिनिधींनी शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची तसेच शिक्षण विभागाने काढलेल्या जीआरमधील त्रुटीची माहिती त्यात देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *