नित्य नियमाने व्यायाम करण्याचे फायदे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ सप्टेंबर ।

# हृदयविकारांपासून मुक्ती मिळते:
व्यायाम करणार्‍याचे हृदय निरोगी असते. त्यामुळे हृदयाचे ठोके सामान्य असतात. फुफ्फुसांवरही ताण पडला तर सहन होतो. त्यांचा श्‍वास चांगला असतो. अशा व्यक्तींच्या रक्तवाहिन्या निर्दोष असतात, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि त्यांना अती कमी अथवा उच्च रक्तदाबाचा त्रास होत नाही. त्यामुळे त्यांना विविध हृदयविकारांपासून मुक्ती मिळते.

# व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते:
व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते. अशा व्यक्तींचे जीवन केवळ दीर्घच असते असे नव्हे तर ते तुलनात्मकरित्या वेदनांपासून मुक्त आणि अनेक प्रकारच्या पीडांपासून दूर असते.

# नितळ त्वचा, चमकदार केस आणि निरोगी नखे:
व्यायाम करणार्‍यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम शरीरावर होतातच पण ते त्वचा, केस, आणि नखांवर प्रतिबिंबित होत असतात. नियमित व्यायाम करणार्‍यांचे केस भराभर वाढतात व त्याच्यावर उत्तम चकाकी असते. अशा व्यक्तींची त्वचा नितळ असते आणि नखांची वाढसुध्दा निरोगीपणे होत असते.

# शरीराची कार्यक्षमता वाढते:
नियमितपणे व्यायाम करणार्‍यांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते आणि त्यामुळेच त्यांची उर्जा पातळी चांगली असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा कितीही भार पडला तरी तो त्यांना सहन होतो आणि ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात.

# मन सकारात्मक राहते:
व्यायाम करणार्‍यांची विचार करण्याची पध्दत सकारात्मक असते त्यामुळे त्यांची उत्पादकताही चांगली असते. कमी उर्जेमध्ये आणि कमी वेळेमध्ये उत्तम काम करण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झालेली असते. कोणत्याही गोष्टीचा आळस येत नसल्यामुळे कोणतेही काम करायला ते सदैव तत्पर असतात.

# शरीरातील हाडे मजबूत बनतात:
व्यायाम करणार्‍या व्यक्तीची हाडे मजबूत असतात त्यामुळे पडणे, धडपडणे, मुरगळणे, आखडणे, करक लागणे अशा गोष्टींचा त्रास त्यांना होत नाही. परिणामी अशा छोट्या-छोट्या तक्रारींसाठी शारीरिक ऊर्जा वाया जाण्याचे प्रमाण त्यांच्यात कमी असते.

# रोग प्रतिकारशक्ती वाढते:
नियमित व्यायाम केल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि त्यामुळे वारंवार होणारे अपचन, सर्दी, खोकला, फ्ल्यू यांसारख्या सतत होणाऱ्या संसर्गजन्य रोगापासून शरीराचा बचाव साधला जातो. याचबरोबर अशा व्यक्ती कर्करोग, हृदयविकार, रक्तदाब, पित्त अशा गंभीर विकारांपासूनही मुक्त असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *