महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.४ सप्टेंबर । सोन्याच्या दरात (Gold Price Today) आज घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याचा दर आज किरकोळ 80 रुपयानी कमी झाला आहे. तरी दखील सोन्याचे दर 47000 रुपये प्रति तोळापेक्षा जास्त आहेत. आजच्या घसरणीनंतर सोन्याचे दर 47,200 रुपये प्रति (Gold Rates) तोळा आहेत. गुड रिटर्न्स वेबसाइटने (Good Returns) जारी केलेल्या किंमतीनुसार हे आजचे सोन्याचे दर आहेत. दरम्यान सोन्याच्या उलट परिस्थिती चांदीमध्ये पाहायला मिळाली आहे.
गुड रिटर्न्स वेबसाइटन दिलेल्या माहितीनुसार चांदीचे दर (Silver Price Today) वधारले आहेत. चांदीच्या किंमतीत (Silver Rates) आज 100 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर चांदीचे दर प्रति किलो 63,600 रुपये झाले आहेत. शुक्रवारच्या दरापक्षा चांदीच्या किंमतीत आज 100 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे.