महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.४ सप्टेंबर । दुधीभोपळा ही अनेकांसाठी नावडती भाजी असली तरी आरोग्यासाठी ती पोषक असते. ही भाजी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. दुधीमध्ये व्हिटामिन बी, व्हिटामिन सी, लोह आणि सोडियम मोठय़ा प्रमाणात असते. रक्ताची कमतरता असलेल्यांनी दररोज दुधीचे सेवन करावे. दुधीच्या सेवनाने वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. दुधीमधील पाण्याचा अंश मेंदू ताजातवाना ठेवण्यास मदत करतो. दुधीचा रस आठवडय़ातून 2-3 वेळा घेतल्यास ब्लड प्रेशर कंट्रोलमधये राहू शकते. तसेच हृदयासंबंधीचे आजार दूर होतात.