अभिजात सौंदर्याने लाखो प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या माधुरी दीक्षितचा मराठमोळा साज; फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा पाऊस

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ सप्टेंबर । आपल्या अभिनयाने आणि त्यासोबतच अभिजात सौंदर्याने लाखो प्रेक्षकांना भुरळ घालणारी ‘धक धक गर्ल’ म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित.

माधुरीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हिरवी पैठणी साडी, नथ असा हा माधुरीचा साज नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. माधुरीच्या या फोटोंवर हजारो लाइक्स मिळाले असून नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्सदेखील केले आहेत. पैठणी साडीतील माधुरीचा लूक अगदी मनमोहक दिसतोय. सध्या माधुरी कलर्स टीव्हीवरील ‘डान्स दीवाने ३’ या कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम करताना दिसत आहे. (  फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित / इन्स्टाग्राम)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *