ATM आणि क्रेडिट कार्डच्या नियमातील ‘हा’ बदल समजून घ्या ; अन्यथा होईल नुकसान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ सप्टेंबर । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) डेटा स्टोरेजशी संबंधित टोकनाइजेशनचे (RBI tokenization rules) नियम जारी करण्यात आलेत. यानुसार ग्राहकांना आपल्या कार्डची माहिती फूड डिलिव्हरी अॅप, कॅब सेवा देणाऱ्या कंपन्या अशा कोणत्याही थर्ड पार्टी अॅपसोबत शेअर करता येणार नाही. याआधी अॅपमध्ये माहिती स्टोअर केली जात होती, मात्र यामुळे माहितीच्या चोरीचा धोका राहतो. म्हणून नवा नियम लागू होणार आहे. यात ग्राहकांना आपला डेटा शेअर करायचा की नाही याचं स्वातंत्र्य असेल.

आरबीआयच्या (RBI) नव्या नियमांनुसार 1 जानेवारी 2022 पासून कार्ड देणारी बँक आणि कार्ड नेटवर्क वगळता कुणालाही कार्डची माहिती स्टोअर करता येणार नाही. याआधी स्टोअर केलेल्या डेटालाही फिल्टर केलं जाणार आहे. असं असलं तरी ट्रांजेक्शन ट्रॅकिंग किंवा इतर मूलभूत सोयींसाठी संस्था काही मर्यादित माहिती स्टोअर करु शकतात. यात कार्ड नंबर आणि कार्डधारकाच्या नावाचे शेवटचे 4 अंक स्टोअर करण्याची सूट असेल.

नियम पाळण्याची जबाबदारी कार्ड नेटवर्कची असणार आहे. CoFT मोबाईल, लॅपटॉप, डेक्सटॉप स्मार्ट वॉच इत्यादींमार्फत केलेल्या पेमेंटला हे नियम लागू असतील. टोकन सर्विस प्रोव्हायडरकडून देण्यात आलेल्या कार्डला टोकनायजेशनची सुविधा दिली जाईल. टोकनायजेशनसाठी AFA चा वापर होईल.

निश्चित ठरलेल्या वेळेपेक्षा अधिकदा बँकांच्या एटीएममधून पैसे काढल्यास 1 जानेवारी 2022 पासून नवी शुल्क आकारणी होईल. भारतीय रिजर्व्ह बँकेने (RBI) फ्री लिमिटपेक्षा अधिकवेळा एटीएममधून पैसे काढल्यास आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्याची परवानगी बँकांना दिलीय. लिमिटपेक्षा अधिकवेळा पैसे काढल्यास 21 रुपये द्यावे लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *