महाराष्ट्र २४- बारामती : बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाले आहेत. यामध्ये एकूण 21 जागांपैकी आतापर्यंत 7 जागांचा निकाल लागला आहे. या निवडणुकांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजिप पवारांच्या पॅनलने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत निलकंठेश्वर पैनलला 11 जागा मिळाल्या आहेत. तर सहकार बचाव शेतकरी पैनलला 5 जागा विजयी झाल्या आहेत.
सत्ताधारी रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे या गटाला फार मोठा धक्का बसला असून पुढील राखीव पाच जागांसाठी मतमोजणी होत आहे. या सर्व जागांवर राष्ट्रवादीचे निलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातून गेलेला हा कारखाना पुन्हा सत्ताकाबीज केला आहे असंच म्हणावं लागेल.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. या निवडणुकीत 21 जागांसाठी या दोन्ही पॅनलसह अन्य 14 अपक्ष असे एकूण 56 उमेदवार रिंगणात आहेत. 23 फेब्रूवारीला या निवडणुकांसाठी मतदान झालं असून 224 तारखेपासून मतमोजणी सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी आपला मतदान हक्क बजावला होता. या कारखान्याचे सभासद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यामुळे या कारखान्याच्या नावलौकिक महाराष्ट्र भर आहे. सध्या या कारखान्यावर पवार विरोधी गटाची सत्ता आहे. पण आता ही सत्ता अजित पवारांनी खेचून घेतली आहे.