जीन्सच्या खिशावर असणाऱ्या या बटणांचा इतिहास ; बटणं नेमकी कशासाठी असतात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ सप्टेंबर । हल्ली जीन्स पँट म्हणजे थोरामोठ्यांपासून वापरला जाणारा पेहराव आहे. शहरांपासून गावांपर्यंत जीन्स पँटची फॅशन चांगलीच लोकप्रिय आहे. या जीन्स पँटवर खिशाच्या वरच्या बाजूला लहान बटणं हमखास आढळून येतात. ही बटणं नेमकी कशासाठी असतात, हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल.

जीन्सच्या खिशावर असणाऱ्या या बटणांचा इतिहास बराच जुना आहे. 1829 साली लिवाइस ही कंपनी जीन्सच्या बाजारपेठेत नवीन होती. त्यावेळी फक्त खाणीत काम करणारे मजूर जीन्स परिधान करत. या मजुरांकडून जीन्सचे खिसे लवकर फाटतात, अशी सर्रास तक्रार केली जायची.

त्यावेळी जेकब डेविस या शिंप्याने जीन्सचे खिसे फाटू नयेत म्हणून त्यावर लहान बटणं लावली. या बटणांना रिवेटस् म्हटल जाते. त्यामुळे खिसा आणखी मजबूत झाला.

जेकब डेविस यांना जीन्सवरील या लहान बटणांच्या संकल्पनेचे पेटंट घ्यायचे होते. मात्र, त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. तेव्हा जेकब यांनी लिव्हाइस कंपनीकडे मदत मागितली. त्यानंतर लिवाइस कंपनीने जीन्सच्या खिशांवर तांब्याची बटणं लावायला सुरुवात केली व जेकब यांना कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरी दिली. तेव्हापासून जीन्सच्या खिशांवर लहान बटणं लावायची फॅशन सुरु झाली.

आज इतक्या वर्षानंतरही 18 व्या शतकातील ही फॅशन प्रचलित आहे. जवळपास प्रत्येक जीन्स पँटच्या खिशांवर तुम्हाला अशी बटणं लावलेली दिसतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *