महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ सप्टेंबर । घरोघरी गौरीचे उत्साहात आगमन “आली, आली गौराई, सोन्या रुप्याच्या पावलानं… आली आली गौराई धन धान्याच्या पावलांन..! रविवार ता.१२ रोजी पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत ज्येष्ठा गौरीचे उत्साहात आगमन झाले.
यावर्षीही कोरोनाचे सावट असले तरी गणपती पाठोपाठ महिलांनी गौरीपूजन हा महत्वाचा सण घराघरांतून मोठ्या भक्तिभावाने मंगलमय वातावरणात गौराईंचे स्वागत करत साजरा केला.
घरोघरी गौरीचे उत्साहात आगमन झाल्यानंतर सुंदर भरजरी साड्यांनी व दागीन्यांनी साजशृंगार केला. घरोघरी सुंदर आरास करण्यात आली. काही ठिकाणी गौरीला विविध प्रकारच्या पक्वानांचा नैवेद्य दाखवीण्यात आला. फराळाचे विविध पदार्थ मांडण्यात आले. या दिवशी महिलांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला. यावेळी शक्तिचे प्रतीक म्हणून पूजल्या जाणार्या या गौरीकडे कोरोना संकटाचे निवारण व्हावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.