भारतीय उद्योगपतींनी अमेरिकेत गुंतवणूक करावी : ट्रम्प

Spread the love

महाराष्ट्र २४- नवी दिल्ली ; भारतीय उद्योगपतींनी अमेरिकेत गुंतवणूक करावी, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी केले. अमेरिकन दूतावासात भारतीय उद्योगपतींना निमंत्रित करण्यात आले होते, त्यावेळी ट्रम्प बोलत होते. रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्यासह प्रमुख उद्योगपती यावेळी उपस्थित होते.

भारतात झालेले स्वागत पाहून मी भारवून गेलो आहे, असे सांगतानाच ट्रम्प यांनी चालू वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिक पक्ष विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

ट्रम्प म्हणाले, आपला पक्ष पुन्हा विजयी झाला तर शेअर बाजारात जबरदस्त तेजी येईल. विरोधी असलेला डेमोक्रॅटिक पक्ष जहाल आहे. त्यामुळे सुज्ञ अमेरिकन नागरिक रिपब्लिक पक्षाच्याच बाजून उभे राहतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

कोरोना व्हायरसने सध्या जगात हाहाकार उडविलेला आहे. या आजारावर मात करण्यासाठी जगाने एकत्र येणे आवश्यक आहे, असेही ट्रम्प म्हणाले. भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक प्रकारची समानता आहे, असे सांगतानाच ट्रम्प यांनी अमेरिकेत अनेक प्रकारचे निर्बंध असले तरी मागील काही काळात यात बरीच शिथिलता आणण्यात आली असल्याचे सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *