डोनाल्ड ट्रम्प याचा दोन दिवसांचा भारत दौरा पूर्णच, मायदेशी रवाना ःभारत-अमेिरका तीन करारवर स्वाक्षऱ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – नवी दिल्ली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसांचा भारत दौरा पूर्ण झाला असून आपल्या मायदेशी रवाना झाले आहे. त्याआधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सन्मानात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत स्न्हेभोजन आयोजित केलं होतं. त्यानंतर ट्रम्प दाम्पत्य अमेरिकाला रवाना झाले. अहमदाबादमध्ये पोहोचल्यानंतर नमस्ते ट्रम्प आणि आग्र्यात ताज महल पाहिल्यानंतर आज दिवसभर ट्रम्प दिल्लीत मुक्कामी होते. राजघाटावर महात्मा गांधींनी आदराजंली वाहिल्यानंतर ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा झाली.

तीन करारवर स्वाक्षऱ्या
यादरम्यान ती करारवर दोन्ही देशामध्ये स्वाक्षऱ्या झाल्या आहे. हे करार ऊर्जा क्षेत्राशी संबंधीत आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की, भारत आणि अमेरिकेमधील सुरक्षा करार आणखी व्यापक करणार आहे. 3 अब्ज डॉलर किंमतीच्या या सुरक्षा कराराला अंतिम स्वरूप देण्यात आलं आहे. या करारनुसार, अपाचे आणि एमएच 60 रोमियो हेलिकॉप्टर सह आत्यधुनिक सैन्य हत्यार दिले जाणार आहे.

या मुद्द्यांवर झाली चर्चा
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत व्यापार, उद्योग, ऊर्जा आणि दहशतवाद्यांशी एकत्र लढण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. दोन्ही देश हे इस्लामी दहशतवाद्याचा विरोधात आहे. त्यासाठी दोन्ही देश सुरक्षेसाठी एकत्र आहे, अशी ग्वाही दोन्ही नेत्यांनी दिली. तसंच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं भारतातील स्वागत हे ऐतिहासिक होतं आणि ते कायम स्मरणात राहिल, असं मोदी म्हणाले. अमेरिकेसोबत मैत्रीपूर्ण नाते हे दोन राष्ट्रमध्ये नसून दोन्ही देशाच्या नागरिकांमध्ये आहे, अशी भावनाही मोदींनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *