पाच दिवसांच्या बाप्पांना आज निरोप : पहा विसर्जनाचा मुहूर्त

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ सप्टेंबर । प्रथम पूजनीय गणपतीच्या गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आहे. हा सण रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत असेल राहील. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी दुपारी गणपतीचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे भक्त गणपतीची मूर्ती त्यांच्या घरी आणतात त्यांची विशेष पूजा करतात. श्रीगणेश दीड, 5, 7 किंवा 10 दिवस घरात विराजमान असतात. त्यानंतर त्यांचे विसर्जन केले जाते. आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.

या 10 दिवसांमध्ये गणपतीला त्यांचे आवडते मोदक, लाडवांचं नैवेद्य अर्पण केले जाते. असे म्हटले जाते की गणपती दुःख दूर करणारा आणि सुख देणारा आहे. अशा स्थितीत जो कोणी या काळात प्रामाणिक अंतःकरणाने गणपतीची पूजा करतो, त्याला निश्चितच त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या दुःखाचा अंत होतो.

5 दिवसांच्या गणपती विसर्जनाचा मुहूर्त

? सकाळी : 06.01 ते 10.45 मिनिटे

? दुपारी : 12.19 ते 05.03 मिनिटे

? संध्याकाळी : 06.37 ते 10.54 मिनिटे

? रात्री : 1.45 ते 03.11 मिनिटे (मध्यरात्री, 15 सप्टेंबर)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *