UAN-आधार लिंक करण्याच्या मुदतीत 31 सप्टेंबरपर्यंत वाढ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ सप्टेंबर । ईपीएफओने आपल्या खातेधारकांना एक दिलासादायक बातमी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्याशी आधार लिंक करण्याच्या मुदतीत ईपीएफओने वाढ केली आहे. या निर्णयानुसार, 31 डिसेंबरपर्यंत ईपीएफओ कर्मचाऱ्यांना आधारलिंक करता येणार आहे. यापूर्वी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख होती.

UAN-आधार लिंक करण्याची प्रक्रिया?

सर्वात आधी EPFO ​​पोर्टल epfindia.gov.in वर जा
UAN आणि पासवर्ड वापरुन आपल्या खात्याला लॉग इन करा
“Manage” विभागात KYC पर्यायावर क्लिक करा.
यानंतर उघडलेल्या पेजवर आपण आपल्या EPF खात्याशी जोडलेले अनेक कागदपत्रे पाहू शकता.
यानंतर आधारचा पर्याय निवडा आणि आधार कार्डवर असलेले तुमचे नाव टाईप करून save वर क्लिक करा.
तुम्ही दिलेली माहिती सुरक्षित होईल. तुमचे आधार UIDAI च्या डेटासोबत व्हेरिफाईड केले जाईल.
तुमचे KYC दस्तऐवज बरोबर असल्यास तुमचे आधार कार्ड लिंक होऊन जाईल. त्यानंतर तुमच्या आधार तपशीलांसमोर “Verify” लिहून येईल.
तुम्ही जर 1 सप्टेंबरपूर्वी EPFO ​​आणि आधार क्रमांक लिंक केले नाही, तर तुमच्या खात्यात कंपनीकडून येणारे योगदान थांबवले जाईल. तुम्हाला या व्यतिरिक्त ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात. EPF खातेधारकाचे खाते जर आधारशी जोडलेले नसेल तर ते EPFO ​​च्या सेवा वापरू शकणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *