नोकरी विषयक ; बॅंक ऑफ बडोदा करणार बीसी सुपरवायझर पदांची भरती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ सप्टेंबर । बॅंक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda) नोकरीच्या (Jobs) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! बॅंक ऑफ बडोदाने बिझनेस करस्पॉंडंट सुपरवायझर (Business Correspondent Supervisor) अर्थात बीसी पर्यवेक्षक पदांसाठी अर्ज मागविले आहेत. ही भरती जमशेदपूर (Jamshedpur), पूर्णिया (Purnia) आणि जालंधर (Jalandhar) भागात केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार बॅंक ऑफ बडोदा, bankofbaroda.in च्या अधिकृत वेबसाइटवर करिअर विभागात दिलेल्या अर्जाद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख जालंधर क्षेत्रासाठी 25 सप्टेंबर, पूर्णिया क्षेत्रासाठी 5 ऑक्‍टोबर आणि जमशेदपूर क्षेत्रासाठी 11 ऑक्‍टोबर 2021 आहे.

सर्व क्षेत्रांसाठी अधिसूचना आणि अर्ज फॉर्म डाउनलोड करण्यासाठी https://www.bankofbaroda.in/career/business-correspondent-supervisors-on-contract-basis या लिंकवर क्‍लिक करा.

बॅंक ऑफ बडोदामध्ये बीसी पर्यवेक्षक पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार पदवीधर असावेत आणि संगणक ज्ञान (एमएस ऑफिस, ई-मेल, इंटरनेट आदी) असणे आवश्‍यक आहे. तथापि, एमएससी (आयटी) / बीई (आयटी) / एमसीए / एमबीए सारख्या उच्च पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तसेच, नियुक्तीच्या दिवशी उमेदवाराचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्ज आणि निवड प्रक्रिया

संबंधित क्षेत्रासाठीची अधिसूचना आणि अर्ज बॅंकेकडून डाउनलोड केल्यानंतर उमेदवारांनी तो पूर्णपणे भरावा आणि विहित केलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत संबंधित क्षेत्रीय कार्यालयात सादर करावा. उमेदवारांच्या अर्जावर आधारित उमेदवारांना बॅंकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण याची माहिती उमेदवारांना फक्त बॅंकेद्वारे ई-मेलद्वारे पाठवली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या 15 दिवसांच्या आत कळविण्यात येईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *