राज्यातील सर्व शाळांत मराठी सक्तीची, विधानपरिषदेत विधेयक मंजूर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24-मुंबई
राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये पहिली ते दहावी पर्यंतच्या इयत्तांना मराठी भाषा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याबाबतचे विधेयक येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाणार आहे. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून हे विधेयक मंजूर करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

दक्षिणेतील राज्यांमध्ये तामिळ, कानडी आदी स्थानिक भाषा शिकविणे सक्तीचे आहे. त्यासाठी कायदे करण्यात आले आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी सक्तीचा कायदा करण्यात आला. अशी घोषणा मराठी भाषेचे विधेयक सभागृहात मांडले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *