फडणवीस यांच्या प्रश्नांच्या गुगलीवर अजित पवारांनी आदित्य ठाकरेंना वाचवलं

Spread the love

महाराष्ट्र २४ ; मुंबई : कोकणातल्या पर्यंटनावर विधानसभेत तारांकित प्रशनोत्तरावर आज विधानसभेत चर्चा झाली. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंना गुगली टाकला. आदित्य अडचणीत येणार असं दिसताच अजित पवार हे आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावून गेले. चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पर्यटन पायाभूत सुविधा आणि प्रत्यक्ष पर्यटन निधी यावर प्रश्न विचारले. आदित्य ठाकरे यांना सभागृहात प्रथमच आज मंत्री म्हणून उत्तर देत होते. याच प्रश्नावर भास्कर जाधव, वैभव नाईक यांनी प्रश्न विचारले त्यास व्यवस्थित उत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं. पण फडणवीस यांनी थेट पायाभूत सुविधा आणि मूळ पर्यटन विकास निधी यावर अधारित अडचणीत आणणारा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला त्यानंतर ते गोंधळणार हे दिसताच संसदीय राजकारणात मुरलेले अजित पवार मदतीसाठी उभे राहिले.

आता आदित्य ठाकरे काय बोलणार हे सभागृहात सगळ्यांना पाहायचे होते पण आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताना गडबड होईल की काय याचा अंदाज घेत थेट अजित पवार उभे राहत आदित्य ठाकरे यांच्या ऐवजी उत्तर द्यायला उभे राहिले. आदित्य ठाकरे यांची कोंडीत पकडण्याची संधी असतानाच थेट अजित दादांनी उत्तर देत विषयावर पडदा टाकण्यात यश मिळवलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *