महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ सप्टेंबर । जर तुम्ही रेल्वेमध्ये (Railway) नोकरी (Jobs) शोधत असाल तर ही तुमच्यासाठी सर्वोत्तम संधी आहे. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्सच्यावतीने (Chittaranjan Locomotive Works – CLW) अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या अंतर्गत एकूण 492 CLW पदांची भरती केली जाईल. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे कोणतेही इच्छुक उमेदवार CLW च्या clw.indianrailways.gov.in या अधिकृत साइटवर अधिसूचना तपासू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहे.
CLW द्वारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्जदारांनी apprenticeshipindia.org यामध्ये नोंदणी करावी आणि सर्व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावीत. नियुक्तीच्या वेळी याची पडताळणी केली जाईल. यानंतरच नोंदणीची प्रक्रिया सत्यापित केली जाईल. अर्ज करताना उमेदवाराने सर्व कॉलम काळजीपूर्वक वाचले पाहिजेत आणि त्यानुसार अर्ज केला पाहिजे; कारण जर फॉर्ममध्ये काही विसंगती आढळली तर दुसरी संधी दिली जाणार नाही.
रिक्त पदांचा तपशील
फिटर – 200, टर्नर – 20, मशिनिस्ट – 56, वेल्डर – 88, इलेक्ट्रिशियन – 112, एससी मेकॅनिक्स – 4, पेंटर – 12
अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10+2 परीक्षा पद्धतीत दहावी उत्तीर्ण असावा. त्याचबरोबर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.
या निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत / तोंडी परीक्षा होणार नाही. पोर्टलमध्ये दिलेल्या दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे व गुणवत्ता यादीच्या आधारे प्रशिक्षणार्थीची नियुक्ती केली जाईल. अशा शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कॉल लेटर जारी करून नोंदणीकृत ई-मेल आणि मोबाईल क्रमांकाद्वारे सूचित केले जाईल. त्याचवेळी, या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.