महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ सप्टेंबर । सोन्याच्या दरात (Gold Price Today) शनिवारी घसरण पाहायला मिळाली आहे. शनिवारी सोन्याचे दर 45,390 रुपये प्रति तोळावर (Gold Rates Today) पोहोचले आहेत. सोन्याचे दर 45,780 रुपये प्रति तोळावरून कमी होऊन 45,390 रुपये झाले आहेत. तर चांदीचे दर 61,600 रुपये प्रति (Silver Price Today) किलोवर आहे. गुडरिटर्न्स वेबसाइटने हे दर जारी केले आहेत.
सोन्याची खरेदी करणारा भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भारतातील विविध शहरात सोन्याचे दर वेगवेगळे असतात. कारण एक्साइज ड्युटी, राज्यांतील कर आणि घडणावळीसाठी लागलेले शुल्क यामुळे सोन्याचे दर वेगवेगळे असतात.
22 कॅरेट सोन्याचा दर
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, आज नवी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45,550 रुपये प्रति तोळा आहे. तर मुंबईमध्ये 22 कॅरेटचा दर 45,390 रुपये प्रति तोळा आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 43,710 रुपये प्रति तोळा आहेत.
24 कॅरेट सोन्याचा दर
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या दरातही आज घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 46,780 रुपये प्रति तोळा होता. आज या शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,390 रुपये प्रति तोळा आहे.
चांदीचे आजचे दर
सोन्यासह आज चांदीच्या किंमतीत देखील घसरण पाहायला मिळाली आहे. वेबसाइटवरील आकड्यांनुसार चांदीचे दर 1200 रुपयांनी कमी झाले आहेत. शुक्रवारी चांदीचे दर 62,800 रुपये प्रति किलो होते. त्यामध्ये घसरण होऊन आज दर 61,600 रुपये प्रति किलोग्रॅम आहेत.