GOA IS ON: गोव्यात 50 टक्के क्षमतेनं पर्यटन सुरू, पहा काय-काय सुरु झालं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० सप्टेंबर । पणजी । गोव्याबाबत पर्यटकांसाठी काही महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेली आनंदाची बातमी आहे. गोव्यात कॅसिनो, स्पा, मसाज पार्लर, रिव्हर क्रुझ, वॉटर स्पोर्ट्स यांनी काही निर्बंध घालून ते खुले करण्याची राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे पर्यटकांना आता गोव्यात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी येता येणार आहे. नव्या एसओपीमुळे राज्यात पर्यटन आणि संबधित व्यवसायांना उभारी मिळणार आहे. (GOA IS ON: Tourism starts at 50 percent capacity in Goa, see what has started)

गोव्यातील कर्फ्यू संपलेला नाही, त्यामुळे बहुतेक सर्व उद्योग तसेच व्यापार उद्योग सुरू करण्यास परवानगी देताना सरकारने ५० टक्के क्षमतेची अट ठेवली आहे. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. दोन्ही डोस घेऊन १५ दिवस उलटून गेले आहेत किंवा ज्यांनी हे डोस घेतलेले नाहीत अशांना आरटीपीसीआर चाचणी करुनच कॅसिनो, स्पा तथा मसाज पार्लरमध्ये प्रवेश मिळणार आहे.

केरळमधून येणाऱ्यांना आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्राची सक्ती आहे. या राज्यातील विद्यार्थी किंवा कर्मचारी यांना किमान पाच दिवस संस्था अलगीकरणात राहणे भाग आहे. अलगीकरणाची व्यवस्था संबंधित संस्था किंवा शाळेला करावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांना संबंधित कार्यालये किंवा कंपन्यानी करावी. पाच दिवसांच्या अलगीकरणानंतर त्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे भाग आहे. मात्र सरकारी अधिकारी, आरोग्य व्यावसायिक व त्यांच्या पत्नी, २ वर्षाखालील मुले, वैद्यकीय उपचार किंवा मृत्यू घटना, तीन दिवसांच्या प्रवाशांना केरळमधून व्हाया गोवा प्रवास करणाऱ्यांना यामधून वगळण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *