महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० सप्टेंबर । इंधन स्वस्त होण्याच्या अपेक्षांवर पाणी फेरल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी सावध भूमिका घेतली आहे. आज सोमवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दोन्ही इंधन दर सलग दोन आठवडे स्थिर आहेत.
आज सोमवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.२६ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.१९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव ९८.९६ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.६२ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.६३ रुपयांपर्यंत खाली आला आहे. बंगळुरात पेट्रोल १०४.७० रुपये झाले आहे.
आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ९६.१९ रुपये आहे. दिल्लीत डिझेल ८८.६२ रुपये झाला आहे. चेन्नईत ९३.२६ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९१.७१ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.४३ रुपये असून बंगळुरात डिझेल ९४.०४ रुपये आहे.
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत तूर्त पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्यास महाराष्ट्र ,केरळ या राज्यांनी विरोध दर्शवला होता. जीएसटी कक्षेत आल्यास राज्यांना मिळणारा इंधनावरील कर महसूल मोठ्या प्रमाणात कमी होईल, या भीतीने तूर्त पेट्रोल-डिझेलचा जीएसटी समावेश करू नये, अशी आग्रही भूमिका या राज्यांनी घेतली आहे.