EPFO ​चा हा सल्ला पाळल्यास पैसे राहणार सुरक्षित ; नोकरी शोधणाऱ्यांसाठी अलर्ट,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० सप्टेंबर । जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्या पगाराचा काही भाग तुमच्या वृद्धापकाळासाठी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केला जातो. भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कोणत्याही व्यक्तीसाठी खूप महत्वाचा आहे, कारण तो निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करतो. पण सायबर गुन्हेगार तुमच्या म्हातारपणावर लक्ष ठेवून आहेत. फसवणूक करणारे कधी कधी तुम्हाला कॉल, एसएमएस किंवा ईमेलद्वारे काही मेसेज देतात, ते ईपीएफओच्या बाजूने असल्याचा दावा करतात. आपल्या ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) त्यांना वेळोवेळी इशारा देते. ईपीएफओने एका ट्विटमध्ये ग्राहकांना फसवणूक टाळण्यासाठी सतर्क केलेय.

पीएफ रक्कम पगारदार लोकांना त्यांच्या सेवादरम्यान लाभदेखील देते. म्हणूनच तुम्हाला तुमच्या पीएफ पैशाबद्दल नेहमी अपडेट असणे आवश्यक आहे. EPFO ​​वेळोवेळी आपल्या ग्राहकांना अलर्ट जारी करते. हे आपल्या ट्विटर हँडल आणि एसएमएसद्वारे ग्राहकांना अलर्ट पाठवत राहते. ईपीएफओने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ईपीएफओ कधीही आपल्या सदस्यांना त्यांचे वैयक्तिक तपशील शेअर करण्यास सांगत नाही. फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा.

बँकेत कोणतीही रक्कम जमा करण्यास सांगत नाही
याशिवाय ईपीएफओने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ईपीएफओ कधीही फोन किंवा सोशल मीडियावर आधार, यूएएन, पॅन, बँक खात्याची माहिती यासारखी वैयक्तिक माहिती विचारत नाही किंवा बँकेत कोणतीही रक्कम जमा करण्यास सांगत नाही. ईपीएफओच्या सेवांसाठी आणि त्याच्याशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही त्याची अधिकृत वेबसाईट epfindia.gov.in ला भेट देऊ शकता.

ग्राहकांना बनावट वेबसाईटला भेट देणं टाळण्याचा इशारा
म्हणूनच तुम्हाला अशा बनावट इनकमिंग कॉल टाळण्याची गरज आहे, कारण ते हॅकर्सना तुमच्या ईपीएफ खात्यात लॉगिन करण्यास आणि त्याच्या सुरक्षिततेशी तडजोड करण्यास मदत करू शकतात. ईपीएफओने आपल्या ग्राहकांना बनावट वेबसाईटला भेट देणं टाळण्याचा इशाराही दिलाय. जर तुम्ही ईपीएफओच्या अलर्टकडे लक्ष दिले नाही, तर तुम्हाला त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल आणि तुमच्यासोबत फसवणूक होण्याची शक्यता असू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *