महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ सप्टेंबर । राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याकडून कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भात काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण विभागात आज, उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
#Mumbai and #Thane and parts of Raigad, recd isolated heavy rain in last 24 hrs. Most of it came in early morning hrs from 4am as indicated in radar obs with some mod to intense clouds observed over city and around during the period
Scz 71.5mm
Now also cloudy sky towards suburbs pic.twitter.com/nUB5vPbxlQ— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 20, 2021
महाराष्ट्रात बहुतेक भागांत पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता आहे. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांत आज, उद्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतही या काळात पाऊस असेल. एकूणच कोकण, मराठवाडा, विदर्भात काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.