‘TET’ची परीक्षा पुढच्या महिन्यात ; शिक्षकांसाठी बातमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ सप्टेंबर । केंद्रीय लोकसेवा (UPSC) आयोगाची लेखी परीक्षा १० ऑक्टोबरला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) (TET Exam) तारीख पुढे ढकलली असून ३१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात (Maharashtra) ही परीक्षा होणार आहे. ‘टीईटी‘ची तारीख बदलल्याने युपीएससी परीक्षा देणाऱ्या भावी शिक्षकांना दोन्ही परीक्षा देता येणार आहेत. (Education News)

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दोन वर्षांनंतर शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा (टीईटी) १० ऑक्टोबरला घेणार असल्याचे जाहीर केले होते. २०१९ ला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे तर २०२० ला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेही टीईटी झाली नव्हती. त्यामुळे १० ऑक्टोबरला होणारी टीईटी भावी शिक्षकांसाठी महत्त्वाची आहे ; मात्र केद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे प्रशासकीय सेवा पूर्व परीक्षेचा २७ जूनला रद्द झालेला पेपर १० ऑक्टोबरला घेणार आहे.

टीईटी देणारे बहुतांश भावी शिक्षकांनी युपीएससीसाठीही अर्ज केला असल्याने नेमकी कोणती परीक्षा द्यायची? असा प्रश्‍न परीक्षार्थीना पडला होता. यामुळे परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करावा, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातून होत होती. यानुसार परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रकात जाहीर केले आहे.

१० ऑक्टोबरला युपीएससीची लेखी परीक्षा असल्याने टीईटी परीक्षेसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेद्वारे आगामी शिक्षक भरती होणार आहे. तरी सुधारित वेळापत्रक लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ३१ रोजी परीक्षा द्यावी,असे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *