IBM Recruitment: फ्रेशर्सना देणार नोकरी ; IBM देशातील नामांकित Tech कंपनी ; ‘या’ पदांसाठी करू शकता अप्लाय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ सप्टेंबर । कोरोनाच्या काळात झालेल्या भरघोस फायद्यानंतर आता जगभरातील नामांकित IT कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची पदभरती (Latest IT company jobs) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच आहे त्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नामांकित Tech कंपनी International Business Machines म्हणजेच IBM (IBM recruitment India) लवकरच भारतातील काही शहरांमध्ये फ्रेशर्स ग्रॅज्युएट्सना नोकरीची (IBM Recruitment for freshers in India) संधी देणार आहे.

IBM ही कंपनी देशभरातील काही शहरांमधील फ्रेशर्सना नोकरी (IBM Freshers Jobs) देणार आहे. या पदभरती दरम्यान उमेदवारांना असोसिएट सिस्टम इंजिनिअर (Associate System Engineer) हे पद देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना Java, Python, Node.js आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामिंग येणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार विविध प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञानामध्ये अनुप्रयोगांची रचना करेल, कोड लिहील, चाचणी करेल, डीबग करेल आणि सॉफ्टवेअर अनुप्रयोगांची देखभाल करेल.

IBM मधील या पदभरतीसाठी मुंबई, पुणे, दिल्ली/ एनसीआर, गुडगाव, नोएडा, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, बंगलोर, अहमदाबाद या शहरांमधील काही फ्रेशर्सना संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडे काही गुण असणं आवश्यक आहे.

हे गुण असणं आवश्यक

आवश्यक प्लॅटफॉर्मवर तांत्रिक आर्किटेक्चर परिभाषित करणे, Analysis करणे आणि Review करणे आणि आर्किटेक्चर options आणि recommendation देणे हे गुण असणं आवश्यक.

आयटी आर्किटेक्चरशी संबंधित एंटरप्राइज समस्यांच ज्ञान असणं.

कामाशी निगडित टेक्निकल गरज पूर्ण करणे.

कम्युनिकेशन स्किल्स चांगले असणं आवश्यक.

पात्रतेचे निकष

हा जॉब फ्रेशर्ससाठी असल्यामुळे उमेदवार हे त्यांच्या शिक्षणाच्या फायनल इयरला असणं आवश्यक आहे. तसंच IBM मध्ये काम सुरु करण्याच्या आधी उमेदवारांकडे डिग्री असणं आवश्यक आहे. BE/ MTech/ MSc/ MCA in CS/ IT/ यामध्ये उमेदवारांना 6 CGPA असणं आवश्यक आहे.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांना IBM च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जाबद्दल माहिती घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *