30 सप्टेंबरपर्यंत ही काम पूर्ण करा ; अन्यथा खाते बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ सप्टेंबर । ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. ऑटो डेबिटचा अर्थ असा की, जर तुम्ही मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगमध्ये ऑटो डेबिट मोडमध्ये वीज, एलआयसी किंवा इतर कोणतेही खर्च ठेवले असतील तर एका विशिष्ट तारखेला खात्यातून पैसे आपोआप कापले जातील. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचा सक्रिय मोबाईल क्रमांक बँकेत अपडेट करणे आवश्यक आहे. अशा स्थितीत जर तुमचा नंबर अपडेट झाला, नसेल तर 30 सप्टेंबरपर्यंत ते काम पूर्ण करा.

नवीन सिस्टीम अंतर्गत बँकांना पेमेंट रक्कम तारखेच्या 5 दिवस आधी ग्राहकांच्या मोबाईलवर अधिसूचना पाठवावी लागेल. अधिसूचनेला ग्राहकांची मान्यता असणे आवश्यक आहे. 5000 पेक्षा जास्त रक्कम भरल्यावर ओटीपी अनिवार्य करण्यात आलाय. म्हणूनच नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी बँकेत तुमचा योग्य मोबाईल क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे.

# डीमॅट खात्याचे केवायसी: बाजार नियामक सेबीने जारी केलेल्या नियमांनुसार नवीन ट्रेडिंग आणि डिमॅट खाते उघडण्यासाठी नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यानुसार जर तुमच्याकडे डीमॅट खाते असेल, तर तुम्हाला ते 30 सप्टेंबरपर्यंत केवायसी करावे लागेल. जर केवायसी केले नाही तर डीमॅट खाते निष्क्रिय केले जाईल. यामुळे तुम्हाला शेअर बाजारात व्यापार करता येणार नाही. जरी एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले, तर हे शेअर्स खात्यात ट्रान्सफर करता येणार नाहीत. केवायसी पूर्ण आणि पडताळणी केल्यानंतरच हे केले जाईल.

# चेक बुक-पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (यूबीआय) ची विद्यमान चेकबुक 1 ऑक्टोबरपासून बंद होतील. म्हणूनच जर तुमच्याकडे या बँकांचे जुने चेकबुक असेल तर 30 सप्टेंबरपर्यंत नवीन चेकबुकसाठी अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्यवहारात कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. बँकेत जाऊन तुम्ही नवीन चेकबुक सहज मिळवू शकता.

# SBI ने SBI Wecare नावाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन ठेव योजना सुरू केली. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत अधिक व्याज मिळत आहे. या योजनेमध्ये 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त FD सामान्य एफडी पासून 0.8% व्याज मिळेल, ज्यात अतिरिक्त 0.3% समाविष्ट आहे. म्हणजेच जर तुम्ही या योजनेंतर्गत आता 5 वर्षे गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.2% व्याज मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *