कीर्तनकार इंदोरीकरांच्या कीर्तनाआधी कोल्हापूरमधील वातावरण तापलं

Spread the love

महाराष्ट्र २४- कोल्हापूर : कीर्तनकार इंदोरीकर महाराज शुक्रवारी कोल्हापुरात असणार आहेत. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात इंदोरीकर यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि इतर पुरोगामी संघटनांचा इंदोरीकर महाराजांना विरोध आहे. स्त्री जातीचा अपमान करणाऱ्यांचा विद्यापीठात कार्यक्रम नको, अशी आक्रमक भूमिका कोल्हापूरमधील कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता इंदोरीकर महाराजांचा आक्रमक होणार आहे. मात्र त्याआधी सकाळी 10 वाजता कार्यकर्ते विद्यापीठात जाऊन जाब विचारणार आहेत. त्यामुळे कोल्हापुरात इंदोरीकर महाराज यांच्या एण्ट्रीआधी चांगलंच वातावरण तापल्याची चर्चा आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *