काही मिनिटांत 4 लाख कोटींचे नुकसान : शेअर बाजाराला कोरोनाचा फटका,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- मुंबई : शेअर बाजारातून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम शेअर बाजारावर होताना दिसत आहे. शेअर मार्केटलाही कोरोनाची लागण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे रोखे बाजाराला घरघर लागली असून आज सेन्सेक्स तब्बल 1200 अंकानी पडला आहे. तेलाच्या किमतीही आज सहाव्या दिवशी घसरल्या आहे. गेल्या चार वर्षांतील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. चीनव्यतिरिक्त इतर देशांमध्येही कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत उद्योग क्षेत्रावर परिणाम झाला असून जागतिक बाजारात मागणी कमी झाल्यामुळे ही घसरण झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.

आज सकाळी आलेल्या माहितीनुसार, निफ्टी तब्बल 300 अंकानी पडला आहे. तर काही मिनिटांतच तब्बल 4 लाख कोटी रुपयांचा फटका शेअर मार्केटला सहन करावा लागला आहे. हे अंत्यंत चिंताजनक असून यावर उपाय योजना आणणे आवश्यक आहे. कोरोना व्हायरस नियंत्रणात आल्यानंतर सेन्सेक्स पुन्हा उभारी घेईल असे मत शेअरबाजार तज्ज्ञ शशांक रानवे यांनी सांगितले.

जगातील विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीवर कोरोना व्हायरस विळख्याचा परिणाम होताना दिसत आहे. ही बाब गंभीर आहे. कोरोना व्हायरसचा फटका इटली, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांनाही होत आहे. कोरोना हा आता युरोप पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे याचा परिणाम उद्योग क्षेत्रांवर होताना दिसत आहे. परिणामी शेअर मार्केट ढासळला आहे. ही घसरण फक्त भारतात नसून संपूर्ण जगभरातील बाजारांमध्ये मोठी घसरण होताना दिसत आहे, अशी माहिती परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *