कोरोना व्हायरसची भीती घालवण्यासाठी कोल्हापुरात 50 रुपयांमध्ये भरपेट चिकन

Spread the love

महाराष्ट्र २४-कोल्हापूर ; कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे चिकन पोल्ट्री व्यवसायावर परिणाम झाल्याने कोल्हापुरात एका चिकन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.या चिकन महोत्सवात लोकांना खास चिकनपासून बनणाऱ्या पदार्थांची चव चाखता येणार आहे.कोल्हापूर जिल्हा ब्रॉयलर, ब्रीडर वेल्फेअर असोसिएशन, पोल्ट्री फार्मधारक शेतकरी, उद्योजक, कर्मचारी यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे.

अशा महोत्सवाच्या माध्यमातून चिकन बाबतीत गैरसमज दूर व्हावेत हा हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर होऊन चिकनच्या मागणीत वाढ होईल तसंच हा व्यवसाय पूर्ववत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

चीनसह अनेक देशात वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने अनेकांना चिंतेत टाकलं आहे. याचा मोठा परिणाम चिकन व्यवसायावर झाला आहे. चिकनचा खप पूर्वीपेक्षा 50 टक्यांनी कमी झाला आहे. त्यामुळं पोल्ट्री फार्मधारक तसंच चिकन विक्रेते काळजीत आहेत.

कोल्हापूर हे चिकन, मटण चवीनं खाणाऱ्या खवय्याचे शहर म्हणून ओळखले जातं. पण चिकन खाल्ल्याने कोरोना विषाणूची लागण होते, असा आशय असेलेले मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *