महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ सप्टेंबर । लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाकडून १३ एकर जागा देण्यास अधिकारी देण्यास तयार नव्हते, पण यावर आता तोडगा काढला आहे. चंदीगड येथे हवाई दलाला जागा देण्यात येणार असून, त्या बदल्यात पुणे विमानतळाला हवाई दलाकडून १३ जागा देण्यात आली आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळाची क्षमता तीन पटीने वाढणार आहे, असे केंद्रीय केंद्रीय भूपृष्ठ व नौवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
पुणे शहर झपाट्याने वाढत असता विमानतळाची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण हे विमानतळ हवाई दलाच्या ताब्यात असल्याने त्यात अडथळे येत आहेत. त्याबद्दल दिल्ली, पुण्यात अनेक बैठका झाल्यानंतर १८ एकर जागा हवाई दलाने भारतीय विमानतळ प्राधिकरणास दिली. गेल्या दोन वर्षापासून विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, माल वाहतुकीसाठी १३ एकर जागेची आवश्यकता आहे. त्याबाबत गडकरी यांनी सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाष्य केले.