महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ सप्टेंबर । गुरुवारी इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत झालेल्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला. कोलकाताच्या विजयामध्ये सलामीवीर खेळाडू व्यंकटेश अय्यर याने अर्धशतकीय योगदान दिले. अय्यरच्या या खेळाडूमुळे टीम इंडियाचा माजी खेळाडू पार्थिव पटेल प्रभावित झाला असून त्याच्यात युवराज सिंह याची झलक दिसत असल्याचे तो म्हणाला.
व्यंकटेश अय्यर हा पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धा खेळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध त्याने पदार्पण केले. पहिल्याच लढतीत त्याने नाबाद 41 धावा करत केल्या, यानंतर मुंबईविरुद्ध जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट, अॅडम मिल्ने यासारख्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांचा यशस्वी सामना केला आणि 30 चेंडूत 53 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने चार चौकार आणि तीन उत्तुंग षटकार ठोकले. विशेष म्हणजे अय्यरने अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक ठोकले.