महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ सप्टेंबर । केस तुटण्याला अनेकदा तुमचा कंगवाही जबाबदार असतो. खरं तर, बहुतेक लोक केस विंचरण्यासाठी प्लास्टिकचे लहान दाताचे कंगवे वापरतात. ज्यामुळे एकमेकात अडकलेले केस अधिक तुटतात. ही समस्या टाळण्यासाठी, जर तुम्ही कडुलिंबाचा कंगवा (Neem Comb Benefits) वापरला तर तुम्हाला एक नाही तर अनेक फायदे मिळतील. लाकडी कंगवा वापरल्यास केसांमध्ये कमी घर्षण होते, ज्यामुळे केस कमी तुटतात. याव्यतिरिक्त केस देखील कमी तेलकट राहतात. कडुनिंबाच्या कंगव्याच्या अधिक फायद्यांविषयी जाणून घेऊ या .
कडुनिंबाच्या कंगव्याचा नियमित वापर केल्याने डोक्यातील कोंडा आणि टाळूच्या संसर्गाची समस्या दूर होण्यास मदत होते. कडुनिंबाच्या लाकडापासून बनवलेला कंगवा बॅक्टेरियाविरोधी आणि सेप्टिकविरोधी आहे. त्यामुळे डोक्यातील कोंडा आणि टाळूच्या संसर्गापासून आराम मिळतो.
हा कंगवा वापरल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते. ही कंघवा तुमच्या टाळूमध्ये असलेल्या एक्यूप्रेशर पॉइंट्सला कार्यक्षम बनवतो. यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारण्यास मदत होते आणि टाळू निरोगी बनतो. ज्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते.
कडुलिंबाच्या लाकडाचा कंगवा वापरल्याने केस कमी तुटतात. यासोबतच केसांना पोषणही मिळते. कडुनिंबामध्ये बॅक्टेरियाविरोधी घटक असतात, ज्यामुळे उवा येण्याचा धोकाही कमी होतो. तसेच, जेव्हा तुम्ही या कंगव्याने केस विंचरता, तेव्हा टाळूवर असलेले नैसर्गिक तेल केसांमध्ये समान रीतीने पसरते. ज्यामुळे केस निरोगी आणि चमकदार होतात.
मोठ्या लाकडी दाताचा कंगवा वापरल्याने केसांचे तुटणेही मोठ्या प्रमाणात कमी होते. खरं तर, जेव्हा केस एकमेकात गुंतलेले किंवा ओले असतात, जेव्हा तुम्ही लहान दातांच्या कंघव्याने केसांना विंचरता तेव्हा केसांमध्ये अधिक घर्षण होते, ज्यामुळे केस अधिक तुटतात. तर रुंद आणि मोठ्या दातांचा कंघवा केसांना चांगले डिटॅंगल करते आणि केस तुटण्याची समस्याही कमी होते.