गुरुवार ७ ॲाक्टोबर रोजी नवरात्रारंभ- घटस्थापना ; जाणून घ्या नवरात्रातील नवरंग..!

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ सप्टेंबर । महिलांचा आवडता सण म्हणजे नवरात्र (Navratra festival). मात्र, यावर्षी नवरात्र आठ दिवसांचा उत्सव असणार आहे. यावर्षी गुरुवार ७ ॲाक्टोबर रोजी नवरात्रारंभ- घटस्थापना आहे. यावर्षी आश्विन शुक्ल चतुर्थी क्षयतिथी असल्याने यावर्षी नवरात्र (Navratra) आठच दिवसांचे आले आहे. आठव्या दिवशी गुरुवार, दि. १४ ॲाक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन आहे. त्याच दिवशी सरस्वती मूर्ती विसर्जन आहे,

नवरात्र उत्सव हा नऊ दिवसच का असतो ? असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. याचेही उत्तर आपणास शोधता येते. ‘ नऊ ‘ हा अंक सर्व अंकांमध्ये मोठा आहे. नऊ ही ब्रह्मसंख्या समजली जाते. निर्मितीशक्ती आणि नऊ अंक यामध्ये एक नाते आहे. धान्य जमिनीत गेल्यावर नऊ दिवसांनी अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येते. नवरात्र हा निर्मितीशक्तीचा-आदिशक्तीचा उत्सव असल्याने नऊ दिवसांचा असतो. आपल्या ऋषीमुनीनी सण-उत्सवांची रचना करतांना विज्ञानाचा किती बारकाईने विचार केला होता ही गोष्ट आपल्या लक्षात येते.

नवरात्रातील नवरंग या वर्षीचे नवरात्रातील रंग पुढीलप्रमाणे आहेत. गुरुवार , दि. ७ आक्टोबर पिवळा, शुक्रवार, दि. ८ आक्टोबर हिरवा, शनिवार, दि. ९ आक्टोबर ग्रे, रविवार, दि. १० आक्टोबर केशरी, सोमवार, दि. ११ आक्टोबर सफेद, मंगळवार , दि. १२ आक्टोबर लाल, बुधवार , दि. १३ आक्टोबर निळा, गुरुवार, दि. १४ आक्टोबर गुलाबी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *