महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ सप्टेंबर । लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी. लोकल प्रवास करण्यापूर्वी रविवारी कुठे मेगाब्लॉक आहे, (Sunday Megablock) हे जाणून घ्या. त्यामुळे तुमचा वेळ आणि त्रास वाचण्यास मदत होईल. मध्य रेल्वेवर रविवार 26 रोजी हा मेगाब्लॉग (Megablock) घेण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावर ब्लॉक
मध्य रेल्वेने रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक परिचालीत करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉग असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे/गोरेगावसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणा-या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.