महागाईचा फटका ; मुंबई – पुणे प्रवास महागला, इंधन दरवाढीमुळे भाडेवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 25 सप्टेंबर । दिवसागणिक इंधनाचे दर वाढत आहेत. याचा फटका वाहतुकीला बसत आहे. इंधन दरवाढीमुळे भाडेवाढ करण्यात आली. त्यामुळे मुंबई – पुणे टॅक्सी प्रवास महागला आहे. (Mumbai-Pune fare) प्रिपेड टॅक्सी भाड्यात 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. खटूवा समितीच्या शिफारशीनुसार ही दरवाढ करण्यात आली आहे.

मुंबईतील इंटरनॅशनल आणि डोमेस्टीक विमानतळावरुन मुंबई – पुणे जाणाऱ्या टॅक्सी भाड्यात वाढ करण्यात आल्याने आता टॅक्सी प्रवाशांच्या खिशावर भार पडणार आहे. एसी आणि नॉनएसी टॅक्सी भाड्यात 100रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना एसी टॅक्सीसाठी 425 ऐवजी 525 रुपये तर नॉनएसी टॅक्सीसाठी 350 ऐवजी 450 रुपये मोजावे लागणार आहेत.

पेट्रोल, डिझेलचे वाढते दर, विम्याचा हप्ता, मोटार वाहन कर, दुरुस्ती देखभाल हा खर्च परवडेनासा होऊ लागल्याने भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी टॅक्सी चालकांकडून सांगण्यात आले आहे. खटूवा समितीच्या शिफारशीनुसार ही भाडेवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *