SIM Card बाबत नवा नियम जारी ; केवळ 1 रुपयांत घरबसल्या पोर्ट करता येणार तुमचा Mobile Number

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ सप्टेंबर । सरकारने मोबाइलसंबंधी नियमांत बदल करुन Self KYC ची परवानगी दिली आहे. हे KYC App आधारे होईल. या e-KYC साठी केवळ 1 रुपये चार्ज द्यावा लागेल.

KYC साठी टेलिकॉम कंपन्या ग्राहकांकडे काही डॉक्युमेंट्स मागतात, त्यासाठी ग्राहकांना टेलिकॉम एजेन्सी किंवा फ्रेंचाइजीकडे जावं लागतं. परंतु आता घरबसल्या स्वत: Self KYC करता येणार आहे. त्यासाठी कंपनीच्या वेबसाइट किंवा App वर डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील.

सिम कार्ड बदलण्यासाठीही आता डिजीटल KYC करण्यात येईल. नवा नंबर घेणं, टेलिफोन कनेक्शन घेण्यासाठी KYC पूर्णपणे डिजीटल असेल.

Prepaid to Postpaid आणि Postpaid to Prepaid करण्यासाठी प्रत्येकवेळी KYC प्रोसेस करावी लागते. परंतु हे काम आता 1 रुपयांत तेही डिजीटल स्वरुपात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *