मंदीचे ढग दाटले; विकासदराचे रडगाणे सुरूच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- नवी दिल्ली : मंदीच्या गाळात अडकलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र आजच्या आकडेवारीने या प्रयत्नांना जोरदार झटका बसला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत आर्थिक विकासदर (GDP) ५. ६ टक्के होता. तर यंदा तो ४.७ टक्के आहे. यापूर्वी २०१२-१३ या वर्षात तो ४.३ टक्के होता. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत विकासदर (GDP) ४.७ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. मागील सहा वर्षातील ‘जीडीपी’चा हा सर्वात कमी वृद्धिदर आहे. दरम्यान, करोनाचा प्रकोप वाढू लागल्याने जगभर मंदीचे ढग दाटु लागले आहेत. त्यामुळे चौथ्या आणि शेवटच्या तिमाहीत भारताची आर्थिक स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

औद्योगिक क्षेत्राची सुमार कामगिरी, महागाईचा तडाखा, वस्तूंच्या मागणीत झालेली प्रचंड घट, बेरोजगारी या आणि अशा अनेक समस्यांनी बेजार झालेल्या अर्थव्यवस्थेची तब्बेत तिसऱ्या तिमाहीत आणखी खालावली. त्यातच चीनी अर्थव्यवस्थेला ‘करोना’ने होरपळल्याने त्याची झळ भारताला बसण्याची मोठी शक्यता आहे. चीनसोबत असलेला व्यापार पाहता भारतासाठी ‘करोना’ धोक्याची घंटा ठरेल, अशी भीती जाणकारांनी व्यक केली आहे.

*ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत विकासदर (GDP) ४.७ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.

* मागील सहा वर्षातील ‘जीडीपी’चा हा सर्वात कमी वृद्धिदर आहे. यापूर्वी २०१२-१३ या वर्षात तो ४.३ टक्के होता.

* तिसऱ्या तिमाहीत विकासदरात (GDP) किंचीत वाढ झाली. दुसऱ्या तिमाहीत GDP दर ४.५ टक्के होता.

* प्रमुख औद्योगिक क्षेत्रांचा जानेवारीत वृद्धिदर २.२ टक्के नोंदवला गेला.

* जानेवारी महागाई दर ७.५९ टक्के, साडेपाच वर्षांचा उच्चांक गाठला.

*अर्थसंकल्पात सरकारने चालू वर्षाचा विकासदर ५ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *