आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना , गृहमंत्री अमित शहांनी बोलावल्या बैठकीस राहणार उपस्थित

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ सप्टेंबर । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आज दिल्ली (Delhi) दौऱ्यावर आहेत. वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या (Important meeting in wake of rising Naxal action) संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शासकीय निवासस्थान वर्षाहून दिल्लीला जाण्यासाठी सकाळीच रवाना झालेत. दिल्लीत सकाळी 10 वाजता ही बैठक होणार आहे. ही बैठक दुपारी 2 वाजेपर्यंत चालणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयानं आज दिल्लीत नक्षलवाद प्रभावित राज्यांतील मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्यासाठी या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीत राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतील विकास कामांची सद्यस्थिती आणि रखडलेल्या बाबींवर चर्चा केली जाणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलिस महासंचालक संजय पांडे हे सुद्धा बैठकीला उपस्थित असणार आहेत.

या बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे अमित शहा यांची वेगळी भेट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसचं आजच्या होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलगणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, ओरिसा मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्रचे उपमुख्यमंत्री, झारखंडचे मुख्यमंत्री बंगालचे मुख्य सचिव आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांचा समावेश आहे.

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासह त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची बंददाराआड बैठक झाली होती. या बैठकीनंतर राज्यात शिवसेना आणि भाजपच्या युतीची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. यावेळी अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *