सोलापुर ; कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसाला ट्रकने चिरडलं ; वाळू माफिया सुसाट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ सप्टेंबर । सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे एका अवैध वाळूच्या ट्रकने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडल्याची (illegal sand truck crushed police) घटना घडली आहे. लोकअदालतीचे समन्स बजावण्यासाठी पोलिसाने वाळूच्या ट्रकला थांबवण्यासाठी इशारा केला. पण कारवाईच्या भीतीने वाळू तस्करी करणाऱ्या ट्रकने थेट पोलिसावरच ट्रक चालवली आहे. या घटनेत संबंधित पोलीस गंभीररित्या जखमी होऊन जागीच मृत्यू झाला आहे. यानंतर आरोपी चालकासह त्याच्या साथीदाराने घटनास्थळी ट्रक सोडून पलायन केलं होतं. पण याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपी चालकासह ट्रकच्या मालकाला आणि अन्य एका साथीदाराला अटक (3 arrest) केली आहे.

गणेश प्रभू सोलनकर असं मृत पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. सोलनकर हे सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथील रहिवासी आहेत. सध्या ते मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. तर सागर तानाजी मासाळ, रणजित महादेव सुडके यांच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सोलनकर यांची लक्ष्मी दहिवडी बीटवर नेमणूक आहे. पण लोक अदालतीच्या समन्स बजावण्यासाठी ते दुचाकीने गोणेवाडीला गेले होते. पोलीस पाटील संजय मेटकरी यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधल्यानंतर त्यांनी गावात यायला सांगितलं होतं. त्यानंतर सोलनकर यांना हॉटसन डेअरजवळ येण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानुसार सोलनकर रस्त्याच्या कडेला गाडी लावून त्यावर बसले होते. दरम्यान, मागून येणाऱ्या अवैध वाळूच्या आणि विना क्रमांकाच्या ट्रकला सोलनकर यांनी थांबण्याचा इशारा केला.

पण ट्रक चालकाने ट्रक न थांबवता सोलनकर यांना जोरदार धडक दिली. या घटनेत सोलनकर जागीच मृत पावले आहेत. यानंतर चालकाने ट्रक जाग्यावर सोडून साथीदारासह पलायन केलं होतं. त्यानंतर गोणेवाडीचे पोलीस पाटील संजय मेटकरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ट्रक चालक, ट्रक मालकासह एका साथीदाराविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *