महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ सप्टेंबर । पेट्रोलच्या किमतींमध्ये सलग 21 दिवसांपासून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अशातच डिझेलच्या दरांत मात्र पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठी इंधन विक्रेता कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL)नं दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच, 26 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किमतींमध्ये 25 पैशांची वाढ करण्यात आली आहे. देशाच्या राजधानीत आज पेट्रोलची किंमत 101.19 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे, तर डिझेलची किंमत 25 पैशांनी वाढून 89.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे.
पेट्रोलच्या दरांमध्ये तेल कंपन्यांनी 1 सप्टेंबर आणि 5 सप्टेंबर म्हणजेच, आतापर्यंत दोन वेळा पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel)च्या दरांत 15-15 पैसे प्रति लिटरची घट केली होती. सप्टेंबरमध्ये पेट्रोल-डिझेल 30 पैशांनी स्वस्त झालं होतं. परंतु, त्यानंतर इंधनाच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ किंवा घट करण्यात आली नव्हती. 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किमती देशभरात 20 ते 22 पैशांनी वाढवण्यात आल्या होत्या. तसेच त्यानंतर ठिक 3 दिवसांनी पुन्हा एकदा 25 ते 27 पैशांची वाढ करण्यात आली आहे.
मुंबईसह देशातील इतर महत्त्वाच्या शहरांतील दर
इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL)नं दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोलची किंमत 107.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 96.68 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. तर चेन्नईत पेट्रोलची किंमत 103.79 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 95.10 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे.
देशांतील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर :
देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
दिल्ली 101.19 89.07
मुंबई 107.26 96.68
चेन्नई 103.79 95.10
भोपाळ 109.63 97.92