IPL 2021: विजयानंतर या ऑल राऊंडरनं केली निवृत्तीची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ सप्टेंबर । टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा आऊट करणाऱ्या बॉलरनं क्रिकेटमधील एका प्रकारातून अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंडचा ऑल राऊंडर आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमचा सदस्य असलेल्या मोईन अलीनं टेस्ट क्रिकेटला अलविदा केला आहे. त्यानं घेतलेल्या या निर्णयामुळे फॅन्सला धक्का बसला आहे. आयपीएल स्पर्धेत चेन्नईची (CSK) टीम सध्या टॉपवर असून त्यांनी रविवारी झालेल्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) शेवटच्या बॉलवर पराभव केला.

मोईन अलीनं विराटला सर्वाधिक 10 वेळा आऊट केलं आहे. ‘रन मशीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटला सर्वाधिक वेळा आऊट करणाऱ्या मोईननं आता मर्यादीत ओव्हर्स क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचं जाहीर केलं आहे.

‘इएसपीएन क्रिकइन्फो’नं दिलेल्या वृत्तानुसार मोईन अली पुढील काही महिन्यांमध्ये होणारा टी20 वर्ल्ड कप आणि अ‍ॅशेस सीरिजसाठी इंग्लंडच्या संभाव्य सदस्य आहे. या दोन स्पर्धांसाठी त्याला बराच काळ घराच्या बाहेर राहावे लागणार होते. त्यामुळे तो अस्वस्थ होता. मोईन आता इंग्लंडकडून मर्यादित ओव्हर्सचं क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहे. तसंच तो काऊंटी क्रिकेट आणि टी20 लीगमध्ये देखील खेळणार आहे. पण, फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणार की नाही? याबाबत त्यानं अजून ठोस निर्णय घेतलेला नाही.

मोईनची टेस्ट कारकिर्द
मोईन अलीचा टेस्ट रेकॉर्ड हा चांगला आहे. त्यानं दिग्गज ऑल राऊंडर इयान बोथम आणि गॅरी सोबर्स यांच्यापेक्षा कमी टेस्टमध्ये 2000 रन आणि 100 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. मोईननं एकूण 64 टेस्टमध्ये 195 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीमध्ये तो 16 व्या क्रमांकावर आहे.

टेस्ट क्रिकेटमध्ये एकवेळा 10 आणि पाचवेळा 5 विकेट्स घेणाऱ्या मोईननं बॅटनंही चांगली कामगिरी केली आहे. त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये 5 शतक झळकावली आहेत. यापैकी 4 शतक त्यानं 2016 साली झळकावली होती. तसंच त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये 14 अर्धशतक झळकावली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *