Farmers ; भारत बंद ; केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱी संघटनांनी पुकारला भारत बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ सप्टेंबर । केंद्र सरकारने (Centre Government) तीन नवे सुधारित कृषी कायदे पारित केले आहेत. या कायद्याला विरोध दर्शवत मागील जवळपास दीड वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे (Farmer) आंदोलन हे सुरु आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज (सोमवारी) शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. त्या अनुषंगाने दिल्ली येथे तर बंदोबस्त वाढविण्यात आला आहेच शिवाय राज्यातील शेतकरी संघटना आणि काही पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे बाजार समित्या, शहरातील मुख्य मार्केट यावर परिणाम होणार असल्याचे चित्र आहे. कॅांग्रेस पक्षानेही आंदोलनाला पाठिंबा दिला असून स्थानिक पातळीवरही पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

केंद्र सरकारने (Centre Government) पारीत केलेल्या नवीन तीन कृषी कायद्याच्या (Three new agricultural act) विरोधात लढा सुरू ठेवण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने (Sanyukta Kisan Morcha) सोमवारी ‘भारत बंद’ची (Bharat Bandh) घोषणा केली आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *