सलग चौथ्या दिवशी सोनं झालं स्वस्त

Spread the love

महाराष्ट्र २४ – मुंबई : शेअर बाजारात प्रचंड पडझडीने गुंतवणूकदार पोळले असताना ग्राहकांना मात्र सोने-चांदीने दिलासा दिला आहे. शुक्रवारी कमॉडिटी बाजारात (MCX) सोने दरात ०. १७ टक्क्याची घट झाली. सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅमला ४२ हजार ३१४ रुपयांपर्यंत खाली आला. चांदी ११०० रुपयांनी स्वस्त झाली. सराफा बाजारात मात्र सोने ४१ रुपयांनी महागले. आजचा सराफा पेढींवरही सोन्याचा दर दहा ग्रॅमला ४२३५४ रुपये होता.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) आज सोने ४२३१४ रुपये होते. सोमवारी सोन्याचा भाव ४३७८८ रुपयांच्या विक्रमी स्तरावर गेला होता. मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यानं सोन्याचे भाव कोसळले. आज सलग चौथ्या सत्रात कमॉडिटी बाजारात सोने दरात घसरण झाली. चार दिवसांत सोने १५०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. आज चांदीच्या भावातदेखील ११०० रुपयांची घसरण झाली. चांदीचा भाव २ टक्क्यांनी कमी झाला आणि तो ४५५२७ रुपयांवर बंद झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *