महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ सप्टेंबर । येत्या दोन दिवसांत पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाकडून त्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वायव्य आणि पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आगामी दोन दिवस घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होऊ शकतो. मंगळवारनंतर पावसाचा जोर कमी होईल, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे. (Heavy Rain expected in Pune)
27 सप्टेंबरपासून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वेगाने वारे वाहतील. कोकणात 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान वाऱ्याचा वेग वाढेल तर काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल. समुद्र तटिय क्षेत्रात राहणाऱ्या लोकांनी सावधागिरी बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय.
हवामान विभागाकडून राज्यात 11 जिल्ह्यांना रेड अलर्ट
आज म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी पुणे, नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, हिगोंली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोलीसह 11 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. आज अतिवृष्टीची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.