Cyclone Gulab: राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; या जिल्ह्यांना अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ सप्टेंबर । राज्यात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज (IMD predicts heavy to heavy rainfall in some districts of Maharashtra) हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाची (Cyclone Gulab) तीव्रता आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert for 7 districts of Maharashtra) तर 10 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे 28 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कोकण किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

या कालावधीत कोकण किनारपट्टीच्या भागात 40-45 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच समुद्र किनारपट्टीच्या भागातील गावांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert for 7 districts)

पालघर

ठाणे

रायगड

रत्नागिरी

नाशिक

धुळे

जळगाव

या 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई

सिंधुदुर्ग

नंदुरबार

पुणे

अहमदनगर

औरंगाबाद

जालना

बीड

परभणी

हिंगोली

सोमवारी गुलाब चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीभागात धडकले. यामुळे कृष्णा आणि श्रीकाकुलम या जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला आणि जनजीवन विस्कळीत झाले. आज आणि उद्या केवळ महाराष्ट्रासाठी अलर्ट जाहीर कऱण्यात आलेला नाहीये तर मध्यप्रदेश आणि गुजरातमधील काही भागांतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *