![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ सप्टेंबर । गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा किंमतीत सातत्याने घसरण सुरु आहे. त्यामुळे सोन्याचा भाव सात आठवड्यांतील निचांकी स्तरावर पोहोचला आहे. मात्र, बुधवारी सोन्याच्या भावात किंचीत तेजी पाहायला मिळाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर डिसेंबर फ्युचर गोल्डची किंमत 0.13 टक्क्यांनी वाढली आहे. यानंतर सोन्याचा भाव 46, 015 रुपये प्रति तोळावर आहे. तर डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या चांदीची वायदे किंमत 0.17 टक्क्यांनी वाढली आहे. या वाढीनंतर दर 60,568 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
दरम्यान, आगामी काळ सणासुदीचा असल्याने सोन्याचे भाव पुन्हा वरच्या दिशेने प्रवास करु शकतात. डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव पुन्हा 52 हजार रुपये प्रतितोळा इतका होईल, असेही सांगितले जात होते.
विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.