महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० सप्टेंबर । आज गुरुवारी सोन्याचा भाव वधारला असला तरी चांदीमध्ये घसरण सुरुच आहे. सोने ४५ रुपयांनी महागले तर चांदीमध्ये मोठी घसरण झाली.
Goodreturns या वेबसाईटनुसार
सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४६११० रुपये आहे. त्यात ४५ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४६०६५ रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो चांदीचा भाव ५८६०० रुपये आहे. त्यात १८५० रुपयांची घसरण झाली.
याआधी सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली होती. एमसीएक्सवर बाजार बंद होताना सोन्याचा भाव पुन्हा ४६०७१ वर स्थिरावला. त्यात ७६ रुपयांची वाढ झाली. तर चांदी ६५० रुपयांनी वधारून ६०६०५ रुपयांवर बंद झाली. तर मंगळवारी सोने दरात १४९ रुपयांची घसरण झाली होती. सोन्याचा भाव ४५९२० रुपयांपर्यंत खाली घसरला होता. मागील सहा महिन्यातील सोन्याचा हा नीचांकी स्तर गाठला होता.