मुंबई पोलिसांचे नवे बॉस; परमबीर सिंह

Spread the love

महाराष्ट्र २४- मुंबई ; देशाची आर्थिक राजधानी. देशातील अनेक बड्या उद्योगपतीचं राहण्याचं शहर. मुंबई कधी झोपत नाही असं देखील म्हणतात. देशातील सर्वात महत्त्वाच्या शहरातील पोलिसांच्या बॉस ची निवड करण्यात आलीये. मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे सेवानिवृत्त होत असल्यामुळे मुंबई पोलिस आयुक्तपदी कुणाची वर्णी लागणार असा प्रश्न सर्वानाच पडला होता. मात्र आज मुंबईचे नवे पोलिस आयुक्त म्हणून १९८८ च्या तुकडीतले IPS अधिकारी परमबीर सिंह यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने परिपत्रक काढत याबाबत माहिती दिली आहे. 

आयुक्त संजय बर्वे यांना मुदतवाढ दिली जाणार अशी चर्चा रंगली होती.  मात्र त्यांना मुदतवाढ दिली जाणार नाही असं राज्यसरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. नायगाव पोलीस मुख्यालयात बर्वे यांच्या निरोप समारंभाची तयारीही सुरू करण्यात आली होती. यानंतर तब्बल १२ अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा पोलिस आयुक्त पदासाठी होती. मात्र आता मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून परमबीर सिंह यांची निवड करण्यात आली आहे. याआधी परमबीर सिंह हे महाराष्ट्र पोलिस विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *